जे काम सरकार ला नाही जमलं ते काम लोकांनी करून दाखवलं “‘ पंचक्रोशीतील महादेवाचा खोसा”‘ होईल धार्मिक पर्यटन स्थळ – मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

भारतीय संस्कृतीत धार्मिक स्थळांना अनन्य महत्व आहे ते तिर्थक्षेत्र म्हणून अनेक भाविक भक्त आत्म समाधान मिळविण्यासाठी या स्थळी एकत्र येऊन लोक सहभागातून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करतात अशा उत्सवात आम्ही सगळे मानव आहोत आणि मानवतावादी मुल्यांचं दर्शन होतेलोहारा – पोटगव्हाण पंचक्रोशीतील “‘ महादेवाचा खोसा “‘ शेकडो वर्षांपासून धनदाट जंगलात प्रसिद्ध असलेलं प्राचीन स्थळं आहेत महाशिवरात्री ला पंचक्रोशीतील लोक एकत्र येऊन आत्म समाधान मिळविण्यासाठी दर्शन घेण्यासाठी येतात परंतु सरकारने कधी ही या धार्मिक स्थळाची दखल घेतली नाही आणि लोकप्रतिनिधी नी कधी माथा टेकवतांना आम्ही बघितला नाही

“‘ पंचक्रोशीतील महादेवाचा खोसा “‘ आणि शंकराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भावीक भक्तांनी संकल्प केला आणि या स्थळांच्या उत्थानासाठी लोकांना आव्हान केले असता दहा लाखांच्या वर देणगी प्राप्त झाली आम्ही विचार करत बसलो समाजात अजून ही सहकार्याची भावना आहे आणि सरकार ची एक रुपया ची मदत न घेता या “‘ पंचक्रोशीतील महादेवाचा खोसा “‘ उत्थानासाठी असलेला लोक सहभाग सरकार समोर आदर्श धार्मिक स्थळ आपल्या ला दिसून येईल

या पंचक्रोशीतील तिनं दिवस धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, प्रवचन, आणि विचार मंथन झाले लोहारा,पोटगव्हाण,एकलरा, कोदुर्ली, शिवरा, जळका,सोनुर्ली, येथील भावीक भक्तांनी सहभाग नोंदविला, सहकार्य केले, आणि महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी केला.