आज खडकी येथे स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने सरकारला दिली मूठ माती

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने राज्यभर सरकारला मूठ माती आंदोलन राळेगाव तालुक्यात खडकी व बोरी येथे पार पडले……….
अनंत काळापूर्वी ” वामना ” ने दानशूर ” बळीराजा ” ला तिन पाऊल जमीभनीचे दान मागीतले. उदार बळीराजाने ते देण्याचे वचन दिले. वामनाने पहिल्या दोन पाऊलात संपूर्ण जमीन व्यापली. तिसर पाऊल ठेवण्यासाठी जमीन नसल्याने, तिसरे पाऊल कुठे ठेवू? हा प्रश्न बळीराजाला केला, तेव्हा प्राण जाए, पण वचन न जाए. म्हणत तिसरे पाऊल, माझे डोक्यावर ठेवा, असे म्हणत डोक्यावर ठेवायला सांगीतले. आणी ” बळीराजा ” पाताळात गाडला गेला. अशी आमच्या कडे गाव खेड्यात आख्यायिका सांगितली जाते.
आज शेतक-यांला ” बळीराजा ” संबोधल्या जाते. आणी आजही या “बळी” ची स्थिती पुरातन काळातील ” बळीराजा ” सारखीच झाली आहे.
ब्रिटीश राजवटीत ” कच्चा माला ” चे शोषण होत आहे, देशातील जनता लुटली जात आहे, म्हणून देशात “स्वातंत्र सत्याग्रह” झाला, हजारोनी बलीदान दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाचे पहिले पंतप्रधान श्री पं. जवाहरलाल नेहरूंनी संसदेत, देशाचे औद्योगिकीकरणा साठी शेतक-यांनो त्याग करा, कारण औद्योगिकीकरणा ला भांडवल निर्मीती साठी शेतीमालाचे भाव कमी असणे आवश्यक आहे, असे आवाहन करून, वेगवेगळे शेतीविरोधी कायदे तयार केले, त्या कायद्याना परिशिष्ट 9 मध्ये टाकले. देशाच्या विकासासाठी, समृध्दी साठी ” सरकार ” नावांची व्यवस्था तयार केल्या गेली. आजही ती तशीच किंबहूना जास्त प्रबळ केल्या गेली.
आणी आज हिच ” सरकार ” नांवाची व्यवस्था शेतक-यांचा म्हणजे ” बळीराजा ” चा बळी ( आत्महत्या ) घेत आहे. देशाच्या सत्तेत काँग्रेस, जनता पार्टी, जनता दल, भारतीय जनता पक्ष, संयुक्त पुरोगामी आघाडी या पक्षाची, वेगवेगळ्या झेंड्याचे, सरकारे आली, आणी गेली, आज भाजपचे सरकार आहे. पण या वामनरूपी ” सरकार ” नांवाची व्यवस्था उध्वस्त करण्याचा कोणत्याही सरकारने प्रयत्न केला नाही. उलट ती मजबूत करीत वेगवेगळे कायदे वापरून शेती मालाचे भाव पाडून शेतकरी, कष्टकरी यांचा, तर वेगवेगळे कायदे वापरून, कर आकारून उद्योजक, व्यावसायीक यांचा बळी घेवून ” ऐतखावूंची ” सोय केल्या जात आहे.
म्हणून आज दिनांक 5 नोव्हेंबर ला या ” बळीप्रतीपदा चे दिवशी राळेगाव तालुक्यात खडकी व बोरी येथे वामनरूपी ” सरकार” नांवाचे व्यवस्थेला गाडून, मुठमाती देण्यात आली वबळीराज्य” आणण्याचा संकल्प “करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग,अक्षय महाजन, स्वतंत्र भारत पक्षाचे गोपाल भोयर, दशरथ काळे, गजानन कोल्हे, विठ्ठल खोडें, शामराव मडकाम, अशोक वाभीटकर, मनोज तामगाडगे, भास्कर पाटील, धर्मेंद्र कूत्तरमारे, गोपाल बचाटे,सीध्दार्थ पाटील, अमोल जवादे, निलेश डवरे,गीरीधर ठमके इत्यादी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सरकारला मूठ माती देण्यात आली.