नाफेड अंतर्गत चना खरेदीचे प्रफुल्लभाऊ मानकर यांचे हस्ते उद्घघाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथे खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत नाफेडच्या वतीने होणाऱ्या चना खरेदीचे आज दिनांक २६/३/२०२२ रोज शनिवारला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमान प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले.त्या वेळी सर्व प्रथम नोंदणी करुन मार्केटला चना आणण्याबद्धल पिंप्री दुर्ग येथील शेतकरी वसंतराव ठाकरे, धानोरा येथील शेतकरी शा्मभाऊ येणोरकर, रावेरी येथील शेतकरी राजू कुरटकर यांचा चना हमीभाव ५२३० रुपये दराने खरेदी करुन विक्री संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले, उपसभापती मनिष गांधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद वाढोणकर, अंकुश मुनेश्वर , राजेंद्र तेलंगे, निश्चल बोभाटे, गोवर्धन वाघमारे,प्रविण झोटींग,अनिल देशमुख, मारोतराव पाल, पुरुषोत्तम चिडे, श्रावनसिंग वडते, अशोक काचोळे, ठाकरे साहेब, प्रदीप डाखोरे,पराग इंगोले,कुणाल इंगोले, तसेच खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमडे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.