
प्रतिनिधी//शेख रमजान
बिटरगांव (बु) पोलीस स्टेशन आंतर्गत येत असलेल्य.मुरली बांधाऱ्याच्या परिसरात आज सकाळी एका फारीत बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा हत्येचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी काही स्थानिक नागरिक मुरली बांधाऱ्याच्या बाजूने जात असताना त्यांना दुर्गंधी येऊ लागली. परिसरात पाहणी केली असता, पाण्याजवळ एक पोते दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत संशयास्पद रित्या पडलेले दिसले. नागरिकांनी तातडीने याची माहिती मुरली गावचे पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील मिथुन राठोड यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, पोलीस शिपाई दत्ता कवडेकर, पोलीस शिपाई प्रवीण जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून जेव्हा फारी उघडण्यात आले, तेव्हा त्यात एका अंदाजे ३० ते ४० वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला.आज्ञात इसमाचा अंदाजे १० दिवसा पूर्वी खून करून मृतदेह नदी पत्रात फेकून देण्यात आल्याचे वर्तवले जात आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह फारीत गुंडाळून असल्याने आणि त्यावर काही खुणा असल्याने, ही हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे टाकण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन नदी काठी डॉ. हांडे यांनी घटना स्थळी जाऊन केले .पोलीस आता परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत आहेत. तसेच, मुरली बांधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तपासणी केली जात आहे. “आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत आणि लवकरच या अज्ञात इसमाची ओळख पटवून आरोपींच्या मुसक्या आवळू,” असे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सांगितले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.
