
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकताच बॅंकेच्या निवडणूकीचा कार्यकाल जवळपास संपत आल्याने प्रत्येक ठिकाणच्या सोसायटीच्या माध्यमातून प्रतिनिधी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून नुकतीच संपन्न झालेल्या शेळी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बॅंक प्रतिनिधी पाठविण्याची प्रक्रिया अविरोध न झाल्याने निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये शेळी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा प्रगतीशील शेतकरी श्री श्रीकांत वामनराव इटेकार यांचे नाव एकीकडून सुचविले असताना विरोधकांना मान्य नसल्याने दुसरीकडून परत एक नाव सुचविण्यात आले.त्यामध्ये विरोधकांना कमी मतदान झाले आणि श्रीकांत वामनराव इटेकार यांना जास्त मतदान झाल्याने बॅंक प्रतिनिधी म्हणून श्रीकांत इटेकर यांना विजयी प्रतिनिधी म्हणून घोषित करण्यात आले.त्यावेळी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई मोरेश्वरराव ठाकरे, उपाध्यक्ष सौ.वर्षाताई यशवंत उल्लेवार, अनिल इटेकार, बळीराम भोयर, तुळशीराम पोटे, रघुनाथ मेश्राम, प्रविण नरडवार, प्रफुल्ल वटाणे, श्रीमती सुमनबाई वानखेडे,संजय कुमरे श्री एंबडवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या प्रतिनिधी निवडणुकीचे कामकाज शेळी सोसायटीचे सचिव श्री बनसोड यांनी पाहिले.या निवडीमुळे गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक, तरूण युवक यांच्यामध्ये आनंद झाला असून सर्वत्र आनंदाचा वर्षाव होत आहे.
