
सहसंपादक : रामभाऊ भोयर
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेश भाऊ कचकलवार यांच्या आदेशानुसार दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत युवा ग्रामीण पत्रकार संघाची केळापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रफुल नांन्ने यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली चेतन सामजवार यांची तालुका उपाध्यक्षपदी, तर परवेज खान यांची सचिवपदी नियुक्ती झाली.या बैठकीला सदस्य सागर व्यास, गणेश बेतवार, सोहेल खान, समशेर अंसारी आदी उपस्थित होते.
