सहसंपादक : रामभाऊ भोयर
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना नाफेड अंतर्गत हमीभावाने तूर खरेदी करिता ऑनलाईन नोंदणी दिनांक ,24 मार्च पर्यंत देण्यात आली होती मात्र शेतकऱ्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात ऑनलाइन नोंदणी झाली नसल्याने आता शासनाकडून आणखी पंधरा दिवसाची ऑनलाईन नोदणी करण्याकरिता मुदतवाढ दिली असून शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघ राळेगाव येथे जाऊन तूर विक्री करिता नाफेड अंतर्गत नोंदणी करावी असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमळे यांनी केले आहे.
या ऑनलाइन नोंदणी करिता शेतकऱ्यांनी, शेतकरी नोंदणी अर्ज, बँक पासबुक आधार लिंक असलेले, सन 2024 25 चा सातबारा (तुरीचा पीक पेरा असलेला )आधार कार्ड ,व प्रत्येक फार्म ला वेगळे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 24 मार्च पासून पंधरा दिवसाच्या कालावधीत आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.