संकटाचा ससेमिरा चुकेल, कर्ज फिटेल अशी चिन्ह नाही

सहसंपादक : रामभाऊ भोयर

    

यंदा अतिवृष्टी उपरांत पावसाने उसंत घेतली आणि शेतमालाची काही अंशी वाढ झाली मात्र दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचा घरी कापुस यायची मात्र चिन्ह नाहीत. सोयाबीन च्या एकरी उत्पनात कमालीची घट झाली असून भावही नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या उत्साहावर नापिकीचे गडद ढग उमटू लागल्याने शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता दिसते.
सोयाबीन पीक हाती आले असले तरी एकरी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तालुक्यातील वडकी, वाढोणा,वाऱ्हा, कळमनेर, कापशी या सह कळब,हिवरा (द ) व वर्धा नदी पट्यातील बहुतांश शेत शिवारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतल्या जाते. या वर्षी तणाचा प्रादुर्भाव, प्राथमिक अवस्थेत असतांना सततचा पाऊस, तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर या मुळे सोयाबीन च्या उत्पन्नात कमालीची घट आली आहे. संगम येथील शेतकऱ्याला पाच एकरात 3 क्विंटल सोयाबीन चा उतारा आला, हे प्रातिनिधीक उदाहरण असले तरी सार्वत्रिक परिस्थिती फारशी वेगळी नाही त्यातच सोयाबीन ला 4 हजार बाजारभाव मिळत असल्याने बाजारभावातही त्याची फसवणूक होत आहे.एकरी उत्पादन खर्च व हाती येणारे उत्पन्न यात निव्वळ नफा हा अंत्यत नगण्य तरी आहे किंवा घाटा देखील सहन करावा लागतो आहे.
कपाशी ची स्थिती देखील फारशी समाधानकारक नाही. अनेक ठिकाणी अती पावसाने कपाशीची वाढचं झाली नाही तर काही ठिकाणी वाढ झाली पण पात्या व बोन्डच धरले नाही अशी सार्वत्रिक स्थिती आहे. त्या मुळे यंदा नापिकीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल नाही थोडे फार सोयाबीन आहे पण भाव नाही त्या मुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहे.

‘ कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, गेल्या तीन वर्षा पासुन सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी नापिकीचा सामना करतो आहे.अस्मानी व सुलतानी संकटात वर्षा गणिक वाढ होतांना दिसते यंदा उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न मात्र घटन्याचे स्पष्ट संकेत आहे. कपाशी च्या शेतात एका बोन्ड| ची तिसरी पाकळी किडल्याचे सार्वत्रिक चित्र शेत शिवारात दिसते. सोयाबीन कालच विकले त्यातील एका ढीगाला 4 हजार व दुसऱ्याला 4 हजार 50 रु. क्विंटल भाव मिळाला ही शुद्ध फसवणूक आहे. सत्ताधारी व विरोधकांणा निवडणुक- निवडणुक घेऊन नाचने आवडते. शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत.
बाबासाहेब दरणे
हिवरा( द.)