
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आयटक , महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन यवतमाळ जिल्हा मेळावा नुकताच संपन्न झाला मेळाव्याचे मार्गदर्शक कॉ.भगवान पाटील, कामगार नेते, कोल्हापुर , म्हणाले गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रू.1500/- मीळत होते आता एप्रिल पासून आपल्या आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्याने एक हजार वाढ केली आहे .परंतु ही सरकारने केलेली वाढ ही अतिशय तुटपुंज्य असुन या जिवघेण्या महागाईत या मानधनात जगणे कठीण आहे त्यामुळे किमान वेतनासाठी राज्यव्यापी लढा अधिक तीव्र करणार असे प्रतिपादन त्यांनी मेळाव्याला संबोधितांना केले. मेळावा स्थानिक श्रमशक्ती भवन येथे उत्सहात संपन्न झाला.सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर , सावित्रीबाई फुले, अन्नाभाऊ साठे, शहीदे आझाद भगतसिंग यांचे फोटोला हार अर्पन करून सुरवात करण्यात आली.
यावेळी मेळाव्याचे उदघाटन मा.ल्याकत बी शेख, शापोआ कर्मचारी युनियन तालुकाध्यक्ष यवतमाळ यांनी केले , मेळाव्याचे अधक्ष मा.कॉ.पी. पी.घाडगे , विज कामगार नेते, यांनी मार्गदर्शन करताना आयटक च्या इतिहासावर प्रकाश टाकून विज श्रेत्रातील रोजंदारीवर काम करणारे कामगार वर्गाना आम्ही संघटनेच्या रेट्यातून पुर्वी कायम केले चाळीस दिवस संप केला आपणही शालेय पोषण आहार कामगार सुद्धा जिद्दीने लढले तर न्याय नख्खीच मीळेल अलीकडची राज्य कर्ती मंडळी ही मग ती केद्रातील असो की राज्यातील असो आपल्या ला दोन , अडीच हजार रूपये तुटपुंजे मानधन देवून असंघटीत श्रेत्रातील कामगार वर्गाचे आर्थीक शोषण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला . यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे , जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष शापोआ कर्मचारी युनियन, कॉ.करूणा गजभिये, शा.पो.आ.कर्म. युनियन तालुकाध्यक्ष नेर , जोती टेकाम ,लता कांबळे, सरला गुजर, दता पवार, मंगला भोवते , सुगंदा वाटोळे, फातेमा शेख , पंचशीला धुळे, यानी मेळाव्याला मार्गदर्शन केले कॉ.निरंजन गोंधळेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर सुत्रसंचलन विलास ससाने यांनी केले तर आभार सुरेश गायकवाड यांनी मानले
मेळाव्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 26 हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, थकीत इंधन बिल व मानधन दर महिन्याला देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्य व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे तसेच दिवाळी बोनस लागू करण्यात यावे आदी मागण्या वर चर्चा करून 33 लोकांची जिल्हा कार्यकारिणी करण्यात आली तसेच शापोआ कर्मचाऱ्यांचे तालुका अधिवेशन घेऊन नुतन तालुका कमीट्या गठीत करून 24 सप्टेंबर ला होवू घातलेल्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला .जिल्हात जोरात पाऊस असुन सुद्धा शेकडो शालेय पोषण आहार कर्मचारी महिला व पुरुष उपस्थित होते.
