
जि.प.च्या तोंडावर मनसेच्या वाढत्या ताकतीने इतर राजकीय पक्ष कोमात
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जि. प. व प. स. च्या निवडणुका होऊ घातल्या आहे. राळेगाव तालुक्यात मनसे चा झंझावात चांगलाच गाजतं|ना दिसतो. नुकताच मनसे उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील शेकडो युवकांनी नवनिर्माणाचा झेंडा हाती घेत मनसे मध्ये प्रवेश घेतला. युवकांची फौज मनसेकडे आकर्षित होत असल्याने राजकीय पक्षांना मात्र धडकी भरली असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
महाविकास आघाडी वविरोधी पक्ष भाजपच्या संधी साधु राजकारणाला कंटाळलेल्या युवकांवर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या व महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या आराखड्याचा प्रभाव पडल्याने अनेक जण स्वयंस्फूर्तीने नवनिर्माणाची कास धरत आहेत याचाच प्रत्यय म्हणजे राळेगाव तालुक्यातील शेकडो युवकांनी मनसे उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी तालुक्यातील खैरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, सावित्री येथे , वडकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना फलकाचे अनावरण मनसे मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या युवकांचे उंबरकर व मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष आरीफ शेख, तालुका उपाध्यक्ष गणेश काकडे, तालुका सरचिटणीस संदिप गुरुनुले, मनसे कार्याध्यक्ष राहुल गोबाडे, वडकी विभाग अध्यक्ष दिपक वरटकर, विभाग उपाध्यक्ष जगदीश गोबाडे, विभाग उपाध्यक्ष धिरज गाऊत्रे, खैरी येथील शाखा अध्यक्ष भारत निंबाळकर, शाखा उपाध्यक्ष उमेश हरबडे, शाखा सचिव संदीप कुटे, शाखा सचिव मनोज चौके, खैरी वाहतूक सेना शाखा अध्यक्ष सौरभ डफरे, प्रविण वानखडे, शाखा सचिव आकाश पाटील, चेतन चावरे, सावित्री शाखा अध्यक्ष कपिल मेश्राम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोढे, सचिव सुधाकर नैताम,कोषाध्यक्ष शेषराव बड्डे, वडकी शाखा अध्यक्ष प्रवीण बावणे, शाखा उपाध्यक्ष प्रफुल गराट, अमित उताणे, अतुल राऊत, नितेश जोगी, यशवंत सातघरे, शुभम तुर्के, किरण शिरसागर, मयुर शिंदे, गौरव कडाम, कल्लुमामा पठाण, आदींसह शेकडो
महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.
राळेगाव तालुक्यात मनसे ती ताकद वाढत आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जनतेची कामे करीत तालुक्यात पक्ष वाढतो आहे याचा आनंद वाटतो. तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या कामाचा धडाका व कामं करण्याची शैली, युवकांना जोडण्याचे कसब खरोकरच कौतुकास्पद आहे. इतर पक्ष निव्वळ राजकारण करीत असतांना आपण समाजसेवे द्वारे पक्षवाढवित आहोत. जि. प. व प. स. निवडणुकांमध्ये राळेगाव तालुक्यातुन मनसे ला भक्कम साथ दया. युवकांना जोडले आहेच त्यांना बळ दया. मनसेची राजकीय ताकद तालुक्यात वाढली पाहिजे. शंकरभाऊ वरघट व त्यांच्या सर्व पदाधिकारी, युवक व कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा आहे.
