यवतमाळ राळेगाव तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी वि.के. भोरे तर उपाध्यक्षपदी प्रवीण कोल्हे यांच्यी एकमताने निवड.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी वि.के. भोरे यांची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी प्रवीण कोल्हे व संचिव पदी राजु येंडे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
दि.८ /१०/२०२१ रोजी शुक्रवार ला सभा संपन्न झाली सभेला महसूल कर्मचारी हजर होते सर्व कर्मचारी यांच्या सहमतीने हि निवड करण्यात आली.अशी माहिती यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष गजाननभाऊ बलांद्रे यांनी दिली आहे