
राळेगांव तालुका प्रतिनिधी :–रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिं १२ नोव्हेंबर २०२१ रोज शुक्रवारला नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृह उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, व मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीचे वार्ड निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २ मध्ये. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ मध्ये. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ मध्ये ना.मा . प्र . (महिला )
प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ मध्ये . सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८ मध्ये . ना. मा . प्र
प्रभाग क्रमांक ९ मध्ये . सर्वसाधारण (महिला )
प्रभाग क्रमांक १० मध्ये . अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक ११ मध्ये ना. मा. प्र . (महिला )
प्रभाग क्रमांक १२ मध्ये . अनुसूचित जमाती (महिला )
प्रभाग क्रमांक १३ मध्ये . अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक १४ मध्ये . सर्वसाधारण (महिला )
प्रभाग क्रमांक १५ मध्ये अनुसूचित जमाती (महिला)
प्रभाग क्रमांक १६ मध्ये अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक १७ मध्ये . सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण निघाले असून हे वार्ड निहाय आरक्षण कुं अमृता ओंकार या मुलीच्या हस्ते काढण्यात आले आहे.
आरक्षणामुळे कही खुशी कहि गम
नगरपंचायतिच्या वॉर्डनिहाय आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले तर काहींच्या आशा पल्लवीत झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवकाचे आरक्षण निघाले नाही पण त्यांच्या पत्नीला ते उभे करू शकतात तर काही विद्यमान नगरसेवकांना आपला वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्डातून उभे राहावे लागेल काही नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डालगतचा वॉर्ड मिळाल्याने तेही आनंदी आहे काही ठिकाणी आधी खुल्या प्रवर्गातून लढलेल्या उमेदवारांना आता त्याचाच वॉर्ड राखीव मिळाला आहे काही विद्यमान नगरसेवकांना मात्र त्यांचा वॉर्ड राखीव मिळाला नाही तसेच पाहिजे त्या वॉर्डात आरक्षण न मिळाल्याने अश्या विद्यमान नगरसेवकांची मात्र गोची झाली आहे.
