आदर्श महिला ग्रामसंघ रावेरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दिनांक 10/12/21रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन आदर्श महिला ग्रामसंघ रावेरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.आदर्श महिला ग्रामसंघ ला गावातील 23 स्वयंसहायता समूह जोडण्यात आलेले आहे .गावास्तरावर महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे करीता शिखरसंस्था म्हणुन ग्रामसंघ काम पाहतो या सर्व समूहांना कर्ज वितरित ग्रामसंघ अंतर्गत देण्यात येतो .
या सभेसाठी गावचे सरपंच राजाभाऊ तेलंगे, उपसरपंच गजानन झोटिंग,शिवसेना तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे,तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर बोभाटे यांनी उपस्थित राहून व आदर्श ग्राम योजनेतून ग्रामसंघ याना सामूहिक व्यवसाय करणे साठी आम्ही रावेरी ग्रामस्थ्य यांच्या वतीने सर्वोतोपरी सोबत राहू असे सरपंच यांनी संबोधन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
सभे साठी उपस्थित हे तालुका अभियान कक्ष चे तालुका व्यवस्थापक राजेंद्र खुरपुढे व प्रभाग समन्वयक वरध दिनेश कोवे ,तसेच गावातील सर्व स्वयं सहायता समूहाच्या महिला तसेच गावपातळीवर काम करणारे ICRP, VOA,मसत्यसखी,FLCRP ग्रामसंघ अध्यक्ष सोनू उताणे ताई ग्रामसंघ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.