


राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार अधिकृत राळेगांव तालुका पत्रकार संघ आणि सुप्रभातम् गृप च्या वतीने नगर पंचायत राळेगांव येथे घेण्यात आला आहे. सी.ओ अरुण मोकळं,पाणी पुरवठा अभियंता ज्ञानेश्वर घरडे,शासकीय कंत्राटदार राजाभाऊ दुधपोळे,डाँक्टर कुणाल भोयर,यांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामं केले आहे. जुना जलकूंभ भरणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती.ती अवघ्या दोन महिन्यात नविन टाकण्यात आली आहे.या मध्ये खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करत हे संपूर्ण उत्कृष्ट काम अवघ्या दोन महिन्यात पूर्णत्वाकडे, राजाभाऊ दुधपोळे यांनी शहराचे हित डोळ्यासमोर ठेवून,सामाजिक बांधिलकी जपत नेले. सी.ओ अरुण मोकळं आणि पाणी पुरवठा अभियंता ज्ञानेश्वर घरडे यांनी या जलवाहिनी सह.जलशुध्दीकरण सयंत्र संपूर्ण पणे साफसफाई करुन,सात ते आठ फूट गाळ उपसून पिण्याचे स्वच्छ पाणी नियमित वितरित करण्या साठी कटीबध्द असल्याबाबत, सातत्याने रुग्णसेवा करण्यात अग्रेसर डाँक्टर बाबाराव भोयर यांचा वारसा चालविणारे डाँक्टर कुणाल भोयर यांनी कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केले त्याबाबत,”कोरोना योद्धा” म्हणून त्यांचा सुप्रभातम् गृप चे,रिपाई तालुका अध्यक्ष गोवर्धन वाघमारे व अधिकृत राळेगांव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य अशोक पिंपरे यांचे वतीने मान्यवरांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी राहूल मारकंड, प्रकाश मेहता,महेश शेंडे,फिरोझ लाखाणी,महेश भोयर,गजानन पाल,अफसरअली सैय्यद,रमेश विरुळकर,शुभंम दुधपोळे सह अन्य मान्यवर उपस्थित होते…
