ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था पिंपरी दुर्गच्या अध्यक्षपदी अनिल देशमुख तर उपाध्यक्षपदी शंकरराव येडस्कर

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील पिपंरी दुर्ग येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदाची निवडणूक अविरोध पार पडली.अध्यक्षपदी अनिल शंकरराव देशमुख यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी शंकर भगवानजी येडस्कार यांची निवड करण्यात आली.तर संचालकपदी श्री हेमंत इंगोले, आशिष इंगोले,तृषित इंगोले,भारत डोमकावळे, गजानन धनरे, रमेश खंडरे, ज्ञानेश्वर राठोड, किशोर वटी, प्रफुल्ल इंगोले, सौ.कल्पना प्र.डाखोरे,सौ. कुंदा व. ठाकरे, यांची सुद्धा अविरोध निवड करण्यात आली.ही निवड यशस्वी होण्यासाठी विठ्ठलराव ठाकरे माजी अध्यक्ष, श्री मिलिंद इंगोले खरेदी विक्री संघ अध्यक्ष राळेगाव,कुणाल इंगोले उपसरपंच, अशोकराव घोडे,दिपक हिवरकर, अतुल डोमकावळे ऋषभ देशमुख आदी मान्यवर मंडळींनी अथक परिश्रम घेतले.या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून श्री भगत साहेब, सचिव श्री सोयाम साहेब यांनी मोलाची कामगिरी बजावली.हीअविरोध प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यामुळे गावातील लोकांनी नवनिर्वाचित पदाधिकारी बंधू भगिनींचे अभिनंदन केले आहे.