
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
दि १ जुलै २०२२ रोजी करंजी ( सो ) ता.राळेगाव जि.यवतमाळ येथील युवा सरपंच प्रसाद कृष्णराव ठाकरे यांनी जि. प. प्राथमिक शाळेत करंजी ( सो ) येथील १ ते ५ पर्यंत च्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या स्वंतंत्र वह्या,पेन,पेन्सिल इत्यादी साहित्याचा वाटप केला. व करंजी (सो ) येथील कर्तव्यदक्ष ग्रामसेवक मा.सुनील येंगडे साहेबांचा वाढदिवस साजरा केला,
यावेळी जि.प.प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी,सरपंच प्रसाद ठाकरे,ग्रामसेवक येंगडे साहेब,शाळा समिती अधक्ष विजय देठे,सुधीर घुगरे, जि.प मुख्यद्यापिका कनाके मॅडम,शिक्षक कुदुसे सर,संगीता कडू, ताणबाजी चिंचोलकर,तेजस ठाकरे व इतर गावकरी उपस्थित होते.
