
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राळेगाव तालुक्यातील समविचारी सामाजिक संघटना ला सोबत घेऊन विश्राम भवन राळेगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते या आढावा बैठकीला मा.बळवंतराव मडावी कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.दिलिपराव शेडमाके जिल्हा अध्यक्ष मा विजया ताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) गोंडवाना गणतंत्र पार्टी मा.निकम साहेब मा.मधुकरजी गेडाम तालुका अध्यक्ष आदिवासी विकास परिषद मा.इश्यु माळवे – पारधी समाज संघटना मा दिनेश करपते – बिरसा बिग्रेड राळेगाव हे उपस्थित होते
जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणुका समविचारी सामाजिक संघटना एकत्र येऊन आदिवासी, शोषित पिढीत आणि वंचित घटकांतील लोकानी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे या साठी गोंडवाना गणतंत्र पार्टी सर्वांना समान न्याय देण्यासाठी कार्य तत्पर राहिलं असे मतं बळवंतराव मडावी साहेब यांनी मांडले
आढावा बैठकीच्या निमित्ताने आयोजक विठ्ठल भाऊ धुर्वे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव सर्कल नुसार सदस्यांना सहभागी केले होते यांत सहभागी मा उदे गुरुजी ( करंजी ) ज्ञानेश्वर कुमरे तालुका अध्यक्ष नेर तारा बाई कोटनाके संपर्क प्रमुख विनोद भाऊ पराते ( कोपरी ) गजानन सराटे ( जळका ) जयश्री मेश्राम जिल्हा सचिव परचाके साहेब ( धानोरा ) वाल्मिक मेश्राम दत्ता मरस्कोले (झाडगाव) सोमनाथ पवार पंकज पवार राहुल वाढवे गजानन घोडाम सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक आढावा बैठकीचे प्रास्ताविक विठ्ठल भाऊ धुर्वे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी केले तर सुत्र संचालन दिलीप राव शेडमाके नी केले होते कार्यक्रमाचे आभार नरेंद्र कीन्नाके यांनी मानले.
