
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी व खैरी येथे जयंती उत्सव व सणासुदीला कायम शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वडकी पोलिसांनी शनिवार दि 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पथसंचलन केले,या पथसंचलन मार्च मध्ये नागरिकांना सतर्क राहण्यासाठी इशारा व सूचना देण्यात आल्या,भारत देश हा सुसंस्कृत देश म्हणून ओळखला जातो देशात शांतता कायम राहण्यासाठी शासन दरबारी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे,याचाच एक भाग म्हणून गावपातळीवर साजरी होणारी जयंती सण,उत्सव म्हणून वडकी खैरी येथे कायम शांतता नांदावी यासाठी रूट मार्च करण्यात आला,यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ,व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायकराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वात वडकी व खैरी येथील बसस्थानक परिसरातुन गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत पथसंचलन करण्यात आले,यात दोन पोलीस अधिकारी,25 पोलिस कर्मचारी 10 होमगार्ड व 2 पोलीस जीप यांचेसह रूट मार्च करण्यात आला,वडकी खैरी परिसरात सर्व उत्साहाच्या पाश्वभूमीवर कायम शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही रंगीम तालीम करण्यात आली आहे.
