खैरे कुणबी समाज वार्षिक स्नेहमिलन सोहळ्यात राळेगाव तालुक्यातील समाज बांधव सन्मानित

सहसंपादक : रामभाऊ भोयर

               

संदीप तेलंगे भाजपा तालुका उपाध्यक्ष ,निखिल राऊत सर्वोदय कोचिंग क्लासेस,प्रफुल्ल कोल्हे व्यावसायिक व नितीन तुंबडे व्यावसायिक खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूर च्या वतीने हनुमान मंदिर तेलंगखेडी नागपूर येथे खैरे कुणबी समाजाचा वार्षिक दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आयोजित दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमात राळेगाव येथील संदिप तेलंगे (सामाजिक क्षेत्र),प्रफुल कोल्हे(सामाजिक क्षेत्र), निखिल राऊत (सामाजिक क्षेत्र),नितिन तुंबडे (सामाजिक क्षेत्र), वर्धा येथील विनोद सातपुते (पर्यावरण क्षेत्र),श्रीमती सुरेखा रडके नागपूर (पर्यावरण व सामाजिक), विजया रोकडे वर्धा (पर्यावरण व महिला सक्षमीकरण), सुधिर कोरडे बल्लारशाह (सामाजिक), संगीता बढे (सामाजिक क्षेत्र)अंकुश पिंपरे (सामाजिक )महादेव वैद्य (सामाजिक )किशोर येडे (सामाजिक )इत्यादींचा समाज बांधवांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी नागपूरचे आमदार विकासजी ठाकरे, राजुरा येथील आमदार सुभाषजी धोटे, माजी आमदार देवरावजी रडके, माजी आमदार अशोकभाऊ शिंदे, पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. आरिकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष गुनेश्वर आरीकर,स्वप्नील मोंढे, महादेव वैद्य, मोहन डंभारे, सुरेखा रडके, मनोहर बारई, टेमराज माले, प्रदिप महाजन, फत्तुजी सातपुते इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.