
जिल्हा कराटे दो असोसिएशन चंद्रपूर च्या वतीने फीट टू फाईट , जे बी नगर चंद्रपूर येथे दि. १० जून २०२३ ला आयोजित इंटर डोजो कराटे चॕम्पियनशीप २०२३ आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धेत वरोरा येथिल फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांनी १२ गोल्ड , ७ सिल्वर व ४ ब्रांझ मेडल पटकावित वरोरा नगरीचा तसेच फौजी वाॕरिअर्स चा मान वाढविलेला आहे .
सानिया आवारी , पिऊश विधाने , यश नरडे , निर्गुणा पेंदोर , संस्कार पोलशेट्टीवार , उज्वल रंदये , रितिक धवने , फकीरा निखाडे , सोनू निकोडे , पलक धवने , रौनक बोढे , व प्रज्वल बोढे यांनी गोल्ड मेडल तर दुर्वाक्षी बूजाडे , हर्षाली कपूर , वेदीका भोयर , विहान खिरटकर , शंतनू धवने , निरज आत्राम व वैदई खिरटकर यांनी सिल्व्हर मेडल व देवी परचाके , हर्ष गेडाम , पदमश्री झूरडे व तपस्या धवने यांनी ब्रांझ मेडल पटकावित फौजी वाॕरिअर्स च्या झोळीत तब्बल तेविस मेडल्स ची बरसात केलेली आहे .
फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नेत्रदिपक कामगिरी केलेली आहे . फौजी वाॕरिअर्स चे अध्यक्ष प्रविण चिमूरकर , उपाध्यक्ष रवी तुरानकर , सचिव रवि चरुरकर , कोच अश्विनी नरड आणि साक्षी पर्वत यांच्या सातत्य पूर्वक अथक परिश्रमाने फौजी वाॕरिअर्स एक प्रतिष्ठीत संस्था म्हणून नावारुपास येत आहे
.
