

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव वरून वाढोना बाजार मार्गे वरध येथे जाणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडगाव गावा जवळपास बस रोडच्या कडेला गेल्याने बसमधील १९ प्रवासी जखमी झाली असल्याची घटना दिं.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच दरम्यान घडली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
राळेगाव आगाराची बस ही राळेगाव वरून सायंकाळी ५:०० वाजताच्या दरम्यान प्रवासी घेवून वरध कडे जात होती मात्र बस चालकांचे नियत्रन सुटल्याने बस रोडच्या कडेला जावून बस मधील १९ प्रवासी जखमी झाले असून जखमी प्रवाशांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात होते .मात्र १९ जखमी प्रवाशापैकी ५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून ५ गंभीर जखमी प्रवाशांना यवतमाळ येते पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
