
ढाणकी:प्रवीण जोशी
आलिया जन्माचे करावे स्वहित मना आनंद दत्त वेळोवेळा. खरच या अनमोल दिलेल्या मानव जन्मात काही स्वहित साध्य करायचे असेल तर आनंद सांप्रदाय वीणा प्रयाय नाही. त्यासाठी दत्त नामाची अत्यंत आवश्यकता आहे. हीत ते करावे देवाचे भजन नामाचे साधन साधवावे. या जन्मात काही हित करायचे असेल तर नामस्मरना शिवाय पर्याय नाही. दत्त भक्त दत्तप्रसाद पाटील चंद्रे यांच्या घरी चार महिने चातुर्मास चालला असून. रात्री रोज आनंद बोध ही पोती चालू होती.वाचक श्री दत्तात्रय मोरेवाड हे होते तर,सूचक स्वतः दत्तप्रसाद पाटील चंद्रे हे होते. चार महिन्याच्या चतुर्मासाची आज नुकतीच सांगता झाली. त्यानिमित्त एक्का, व अखंड दत्तनाम दिवसभर चालू होते. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त त्यांनी संत श्री बाळगीर नारायण गिरी महाराज वडगुंफा, संत श्री भगवान गिर महाराज बर्डशेवाळा व संत श्री शामगिर गुरू नरेंद गिर महाराज महाराज हतबल यांना आमंत्रित केले होते. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याप्रमाणे साधू संतांना घरी आमंत्रित करून अखंड दत्त नाम पारा व रात्री महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.भव्य दिव्य अशी महापूजा व दत्त नामाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमली गुरू देव आले माझ्या घरा नाम गर्जना करूया चला. रात्री रात्रभर दत्त नामाचा जयघोष व सकाळी काकडा करून चातुर्मास समाप्ती सांगता करण्यात आली.
