
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हात व्हायरल फिव्हर, डेंगू ,मलेरिया, टायफाईड, डायरिया अशा साथ रोगांचे प्रमाण वाढत असल्यामुळे औषधशास्त्र विभागात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वार्डमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे रुग्णांना बेड मिळत नव्हते. हया बाबीचे गांभीर्य लक्षात घेता महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता डॉ.अनिल बत्रा यांनी माननीय जिल्हाधिकारी श्री विकास मीना व जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्याशी संपर्क साधून काही अतिरिक्त नर्सेस मागितल्या. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी यांनी मदत केली व अधिष्ठाता डॉ.अनिल बत्रा यांच्या निर्देशानुसार औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी व काम पूर्ण करुन घेण्याकरिता समन्वयक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद कुळमेथे यांनी आपली जबाबदारी पार पाडून वार्ड क्रमांक ६ चे नूतनीकरण पूर्ण करून घेतले.
अधिष्ठाता यांनी आवश्यक डॉक्टर्स, आंतरवासी व कर्मचारी उपलब्ध करुन दिल्याने आज दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुरेंद्र भुयार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सदर अतिरिक्त वार्ड रुग्ण सेवेत दाखल करण्यात आले आहे.सदर वार्ड सुरू झाल्यामुळे रुग्णांची बेड कमतरतेची समस्या दूर होणार आहे. त्यामुळे रुग्णांना येणाऱ्या अडचणी या दूर होतील.सदर वॉर्ड सुरू झाल्यामुळे रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी औषधशास्त्र विभागाचे अध्यापक डॉ. गणेश जाधव, डॉ. शेखर घोडेस्वार, डॉ.तुषार खडसे, मेट्रन श्रीमती छाया मोरे , वंदना उईके, अनिता कुंनगर, निशा अत्रे, किरण पाणतावणे ,पुनम खैरकार, कल्याणी मेश्राम, बीव्हीजी चे सुपरवायझर रुचिता थारकर , कक्षसेवक सुधीर व पद्द्वीधर व आंतरवासीता विद्यार्थी ,कर्मचारी आदी उपस्थित होते.या वार्ड च्या पूर्णत्वतेसाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर नितीन रेवते, वरिष्ठ लिपिक अमोल मनोहर, दिनेश जाधव, सॅनिटरी हवालदार मुकेश बामणे, बीव्हीजी चे गणेश तांबारे ,प्रगती निव्हळकर, राजू शहाळे, कार्यशाळेचे श्री.कसंबे, राजू राठोड आदींचे सहकार्य लाभले.
