आनंद निकेतन महाविदयालय, आनंदवन वरोरा येथे संविधान दिन साजरा

संविधान दिनाचे प्रमुख केंद्रबिंदू म्हणजे शालेय विद्यार्थी होते. त्यांना लक्षात ठेवूनच कार्यक्रमाची आधारशीला ठेवण्यात आली होती. श्री. के.के. खोमणे साहेब, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विदयार्थीनां प्रश्न करत त्यांना संविधानाबदल तसेच कायदयाबददल माहिती दिली. प्रमुख उपस्थिती असलेले श्री. अविनाश मेश्राम, पोलीस निरीक्षक शेगाव यांनी सांगितले की देश चालविण्यासाठी हक्क व कर्तव्य या दोन गोष्टींची अंमलबजावणी आवश्यक आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी ची परिस्थिती व भविष्यातील घडामोडी लक्षात घेता हे विस्तृत घटनेची निर्मिती केली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सार्वभौम लोकशाही गणतंत्र या गोष्टी घडविण्याचे कार्य या घटनेमुळे शक्य झाले. घर मजाक भेद रंग यात फरक न करता सर्व भारतीय एकीने आहोत प्रत्येकाला या घटनेतील कर्तव्य अधिकार मिळवता येईल एकंदरीत समता बंधुत्वतः एकात्मता या घटनेमुळे शक्य झाले डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला एक कवळ राज्यघटना मिळाली व आपण सर्वांनी या घटनेची आदर करावे सोबत कार्यक्रमाचा उद्देश्य मात्र हेच आहे की विद्यार्थी देशाचे भविष्य आहे व त्यांना आपल्या संविधानाबद्दल माहिती होणे व आपली कर्तव्य व अधिकार जाणून घेऊन एक आदर्श भारतीय नागरिक होण्याची भूमिका घ्यावी. व आपला समाज व्यवस्थित कळविण्यात हातभार लावावा अशा तऱ्हेने उपस्थित सर्वांचे आभार मानून सरांनी आपली हार्दिक शुभ भाषणाला विराम दिला. प्रा. नितीन आवारी सर यांनी संविधानाबाबात राज्यघटने संदर्भात आपले मनोगत मंचावरुन सर्वांसमक्ष व्यक्त् केली. तसेच आभार प्रदर्शन प्रा. पवार सर यांनी मनःपूर्वक आभार मानले. शेवटी सामूहिक राष्ट्रगीत यानंतर कारगाची कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री. के.के. खोमणे साहेब, 2रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, वरोरा ,प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सवाने मॅडम, उपप्राचार्य आनंद निकेतन महाविदयालय, प्रमुख उपस्थिती श्री. अविनाश मेश्राम पो लीस निरीक्षक, शेगांव, प्रमुख वक्ते प्रा. नितीन आवारी तसेच आनंद निकेतन महाविदयालयातील वरोरा येथील 60 विद्यार्थी व संबंधित शाळेतील शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. सवाने मॅडम, उपप्राचार्य यांनी उदेशीका वाचून केली तसेच सुञसंचालन श्री.मुंडे, सर यांनी केले.
सदरच्या कार्यक्रमात कार्यालयीन कर्मचारी श्री. योगेश कोडपकवार, क. लिपीक, श्री. सदानंद खाडे, क.लिपीक, श्री. आषिश वांढरे तसेच श्री. संतोष वारुंगसे, शिपाई उपस्थित होते.