मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने केले तीव्र निषेध आंदोलन

महायुती सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी राष्ट्रवादीचे ‘अतुल वांदीले’ यांचा सरकारवर प्रहार…!

हिंगणघाट : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांच्या नेतृत्वात निदर्शने देत आंदोलन करण्यात आले.
बांधकामंत्र्यांनी महाराष्ट्रांची माफी मागावी – सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटात केले आणि अनावरण करून या घटनेला एक वर्षही लोटले नाही, तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. याप्रकरणी बांधकाम मंत्री यांनी राजीनामा देऊन अवघ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी व मुख्यमंत्री यांनी याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी करत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हिंगणघाट तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच भविष्यात कधीही महापुरुषांचा असला अवमान सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी यावेळी दिला.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत , प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहाराध्यक्ष बालू वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, जावेद भाई मिर्झा, उपसरपंच मंगेश गिरडे, उपसरपंच प्रवीण कलोडे, शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, विधानसभा अध्यक्ष निता गजबे, सुचिता सातपुते, विद्या गिरी, सुजाता जांभूळकर, दिपाली रंगारी, नालंदा राऊत, मंगला कुमरे मॅडम, अमिता पूनवटकर, सुनीता तामगाडगे, अजय परबत, सुनिल भुते, पप्पू आष्टीकर, गणेश जोशी, , प्रल्हादजी तूराळे, राजू मेसेकर, उमेश नेवारे, बबलू खान, हेमंत घोडे, कुणाल येसंबरे, राजू मेसेकर, सचिन भडे, विपुल थूल, मोहम्मद शाहीद, बचू कलोडे, राजू सराटे, विपुल वाढई, पंकज भट्ट, प्रवीण भूते, सुशील घोडे, आकाश हूरले, गजानन महाकाळकर, सौरभ घोडखांदे, संकेत वंजारी चेतन येनोरकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…