
राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतर्फे मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीसाठी ग्राविकाच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज घेतले होते मात्र निसर्गाचा लहरीपणा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही परिणामी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली भरीसभर शेतमालाला सन्मान जनक भाव सुद्धा नव्हता त्यामुळे शेतकऱ्याची कर्ज फेडण्याची ताकद उरली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशा आशयाचे निवेदन राळेगाव ग्राविकाच्या वतीने तहसीलदार राळेगाव यांना देण्यात आले राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे यांनी नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा ठराव मांडला या ठरावाला सर्व संचालकांनी एकमताने पाठिंबा दिला या ठरावानुसार ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने तहसीलदार अमित भोईटे यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामासाठी पुन्हा नव्याने पीक कर्ज द्यावे नैसर्गिक संकटामुळे तसेच सुलतानी सरकारमुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी अडचणीत आहेत त्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी तातडीने कर्जमाफी करून दिलासा द्यावा सोबतच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे पन्नास हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते अजूनही राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 94 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान मिळाले नाही ते सुद्धा शासनाने द्यावे सोबतच गेल्या दोन-तीन वर्षाचे शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे शासनाकडे प्रलंबित आहे ते सुद्धा शासनाने त्वरित वितरित करावे. सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत आहे अशावेळी शासनाने कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन पर अनुदान पिक विम्याचे पैसे उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांना संकट काळात मोठा आर्थिक दिलासा मिळेल निवेदन देतेवेळी अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी अशोक पिंपरे विनायक नगराळे विनोद नरड गजानन पाल नितीन महाजन कृष्णाजी राऊळकर तातेश्वर पिसे प्रभाकर राऊत शेतकरी लियाकत सैय्यद प्रवीण महाजन सुमित डाखोरे किरण राऊत कर्मचारी अजय भावे आदि उपस्थित होते
