
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कापसाच्या चोर बीटी बियाण्याच्या एचबीटी लागवडीवर केंद्र शासनाने प्रतिबंध घातले आहे मात्र तेलंगणा राज्यातून पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्या त या बियाण्याच्या चोरट्या मार्गाने पुरवठा होत असल्याने अनेक शेतकरी याच बियाण्याचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसात खरिपाच्या हंगामाला सुरुवात होणार असल्याने चोर बीटी बियाणे विकणारे दलाल सध्या जिल्ह्यात सक्रिय झाले आहे . मारेगाव तालुक्यातील चिंचाळा या गावातील एका शेतकऱ्यांच्या गोठ्यात चोरबीटी बोयांच्या विक्री होत असल्याची माहिती जिल्हा कृषी पथकाला मिळाली असती ९ मे रोजी कृषी पथकांनी धाड टाकून चोरबीटी बियाने जप्त केले आहे.
दिवसेंदिवस खते बियाण्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्च ही निघत नाही कापसाच्या शेतातील निदनाचा मोठा खर्च करावा लागतो तन नाशक चा वापर करून हा खर्च कमी करता येतो मात्र तन नाशक चा वापर केल्यास कापसाचे पीक नष्ट होण्याचा धोका असतो मात्र चोर बीटी बियाण्याच्या कापसाच्या झाडावर तन नाशकच्या कोणताही परिणाम होत नाही परिणामी कचऱ्याची समस्या कमी खर्चात दूर होत असल्याने हे चोर बीटी बियाणे प्रतिबंध असूनही शेतकरी या बियाण्याचा वापर करतात.
विशेष करून ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही असे शेतकरी बियाणांचा वापर करतात शेतकऱ्यांकडून दाम दुप्पट किंमत वसूल करीत असल्याने या बियाण्याचा पुरवठा करणारी दलालांची यंत्रणा कार्यरत आहे. एखाद्या एजंट गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना विक्री करते या बियाणाचा वापर रोखण्यासाठी कृषी विभागांची यंत्रणा कार्यरत आहेत तसेच वेळप्रसंगी पोलिसही कारवाई करू शकतात मात्र गावातील बियाण्याची खुल्या विक्री व वापर होत असताना कोणती कारवाई होत नाही विक्री रोखण्याचे मोठे आव्हान कृषी विभागासमोर आहे विशेष म्हणजे गावातील अनेक शेतकरी बियाण्याचा वापर करतात तरी कृषी विभागाच्या कसे काय लक्षात येत नाही कृषी विभागाचे कर्मचारी गावात खरंच जातात काय असा प्रश्न उपस्थित होण्यास वाव आहे. कृषी विभागांनी चोरबीटीचा शोध घेऊन दलालावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
बियाणे ओळखणे कठीण
चोर बीटी बियाणे हे मान्यताप्राप्त बीटी बियाणे तसेच त्यापासून उगवलेले झाड ओळखणे अतिशय कठीण आहे त्यामुळे कारवाई होणे गरजेचे आहे.
झाडाला बोंडे लागत नसल्याच्या तक्रारी कापसाच्या चोर बीटी बियाण्यावर प्रतिबंध असल्याने हे दाम दुप्पट भावाने विकले जातात मात्र या बियाणे बाबत फारशी विश्वासनियत नाही काही चोर बीटी बियाण्याच्या कापसाच्या झाडाला बोंड लागत नसल्याच्या तक्रारी वाढले आहेत तसेच कारवाई होण्याची भीती राहत असल्याने काही शेतकरी मात्र या बियाण्याचा वापर करीत नाही मान्यता असलेल्या बियाण्याच्या कापसाच्या झाडाच्या लागवडीचा खर्च अधिक आहे मात्र त्यापासून उत्पादन सुद्धा होत असल्याने काही शेतकरी मान्यता असलेलेच बियाणे वापरतात
