
सहसंपादक : रामभाऊ भोयर
- शासन निर्णय झाल्यानंतर समायोजनाच्या प्रतिक्षेत कार्यरत 04 विशेष शिक्षकांचे निधन.
- पूर्णतः दृष्टीहीन 150 व इतर 68 दिव्यांग विशेष शिक्षक शिक्षकांसह 2984 विशेष दिनांक -26/05/2025 पासून अन्नत्याग आमरण उपोषण .आयुक्त कार्यालय पुणे येथे करणार आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2984 केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचे 8 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन तर झाले. शासन निर्णय निर्गमित झाला खरा, मात्र 09 महिने उलटूनही अद्याप पर्यंत ही शासन समयोजनाची प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाहीत. यासाठीच राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. 26/05/2025 पासून बेमुदत आमरण उपोषण पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर दृष्टीहीन व ईतर दिव्यांग विशेष शिक्षकांसह इतर सर्व 2984 विशेष शिक्षक आमरण उपोषण करणार आहेत. या बाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला संघटनेच्या निवेदनाव्दारे कळविण्यात आले आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वी स्वतः दिव्यांग बांधवाना त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी बंगला, नागपूर येथे “आपली समायोजन प्रक्रिया अत्यंद जलद गतीने पूर्ण करून लवकरच आपणाला शासकीय सेवेत कायम करण्यात आल्याचे आदेश देऊ” असे शब्द देऊनही 09 महिने उलटून गेले तरी 2984 केंद्रस्तरीय शिक्षकांना कायमचा आदेश मिळालाच नाही.
समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेकरिता मागील 15 ते 20 वर्षांपासून अल्प मानधन तत्वावर विशेष शिक्षक कार्यरत आहेत. कार्यरत विशेष शिक्षकांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र.132/2016 मधील निर्देशानुसार सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावरून प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार कार्यरत विशेष शिक्षकांची जिल्हास्तरावरील कागदपत्र पडताळणी बाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण झालेली आहे. कागदपत्र पडताळणी वेळेत पूर्ण झाल्याने लवकरच आदेश मिळतील या आशेवर असणाऱ्या विशेष शिक्षकांना 09 महिने उलटूनही अध्याप शासन सेवेत समायोजन झाल्याचे आदेश प्राप्त नाहीत. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर कार्यरत विशेष शिक्षकांमधील 04 विशेष शिक्षकांचे निधन झाले असून, त्यांचे कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
आणि म्हणूनच मा. शिक्षण संचालक कार्यालया कडून जो पर्यंत मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (सर्व) यांना केंद्रस्तरावर विशेष शिक्षकांना पद स्थापना, करण्या बाबत चे परिपत्रक नर्गमित होई पर्यंत केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दृष्टीहीन व ईतर दिव्यांग विशेष शिक्षकांसह) दि. 26/05/2025 पासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण करणार आहेत
१५० पेक्षा पूर्णतः अंध आणि इतर ६८ दिव्यांग कर्मचाऱ्यांसह सर्व केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांना घेऊन भर उन्हात आमरण उपोषण करणे हे मानवतेला अशोभनीय आहे. शासनास आमची विनंती असेल की, अजून काही बांधवांचे मृत्यू होण्याची वाट न पाहता तात्काळ समायोजन प्रक्रिया पूर्ण करून केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांना कायमचे आदेश त्वरित मिळण्यात यावे.
आपला महासचिव
गजानन राठोड, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभाग अमरावती
महाराष्ट्र राज्य
