श्री स्वामी विवेकानंद विचार मंचाची किर्तनमाला संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर

श्री स्वामी विवेकानंद विचार मंच्याच्या वतीने विवेकानंद जयंती निमित 11जानेवारीला रक्तदान शिबीर तसेच 12व13 जा.ला किर्तनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .श्री दिगंबरबुवा नाईक व शामबुवा धुमकेकर यांचे जाहीर कीर्तन झाले. हार्मोनियमवर धनराज यावलकर नागपूर तर तबल्यावर सौरभ देवधर यवतमाळ यांनी उत्कृष्ट साथ दिली. श्री. नाईकांनी राष्टसंताचे चरीत्र व कार्य वर्णन करून श्रोत्यांना प्रभावित केले. तसेच महाराजांचे अनेक भजन गाउन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर श्री. श्यामबुवांनी “गड आला पण सिंह गेला “या विषयावर किर्तन सादर करुन श्रोत्यांमधे देशभक्तीचे वातावरण निर्माणकेले. आर्या, पोवाडे अश्या अनेक काव्व्याच्या माध्यमातून वीरश्रीयुक्त शिवकालीन प्रसंग सादर केले. कथेच्या शेवटी श्रोत्यांनी छ. शिवरायांचा जयजयकार करीत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तहसिलदार डॉ रवींद्रकुमार कानडजे उप-निरीक्षक मोहन पाटील नगराध्यक्ष रविंद्र शेराम,संचालक गुरूकुंज मोहरी डॉ मुडे ह. भ. प. विठ्ठल मरसकोल्हे,नंदु नालमवार, नगरसेवक मंगेश राऊत उपस्थित होते. राळेगावकर नागरिकांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे संचालन निखिल राउत, प्रा. अशोक पिंपरे, प्रास्ताविक पुरुषोत्तम मेंढुलकर दिपाली बोकीलवार तर आभारप्रदर्शन डॉ सविता पोटदुखे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंच्याच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.