राळेगाव येथे मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची वार्षिक आढावा बैठक संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव येथे मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची वार्षिक आढावा बैठक दिनांक 18 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकी साठी मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन चे राज्य सचिव साहेबराव राठोड हे उपस्थित होते. राळेगाव तालुक्यातील मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची कार्यकारणी मागील चार वर्षा पासून कार्यरत असून त्याअतर्गत राळेगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सोडवण्यात आलेल्या घटनाचा आढावा यावेळी घेण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद चिरडे यांनी केले .त्याच प्रमाणे राळेगाव तालुक्यातील नवनियुक्त सदस्यां सौं. अर्चना धर्मे यांचे डी. लिट. पदवी प्राप्त झाल्या बद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ओळखपत्र देऊन यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी राळेगाव तालुक्यातील काही गावात विशेष शिबीर आयोजित करून नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यां समस्या सोडवणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले. या वार्षिक बैठकीला मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन चे राज्य सचिव साहेबराव राठोड, कार्तिक पन्नासे अमरावती अध्यक्ष,संतोष जाधव, शेख शाहरुख शेख रज्जाक, डॉ. बी एम कोकरे राळेगाव तालुका अध्यक्ष, सूचित बेहरे तालुका उपाध्यक्ष, विनोद चिरडे तालुका सचिव, सदस्य म्हणून सौं. भावना खणगन, सौं. अर्चना धर्मे,सौं. माधुरी खडसे, हनुमान राडे, मनोज आत्राम, अविनाश राडे, गजानन खंडाळकर हे यावेळी उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूचित बेहरे यांनी केले.