काँग्रेसचा विजय म्हणजेच काँग्रेस विचारांचा विजय :ॲड प्रफुलभाऊ मानकर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला असून हा विजय म्हणजेच भाजप विचारांचा मोठा पराभव असून काँग्रेसच्या विचारांचा विजय आहे, केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी निर्णयांना ग्रामीण भागातील जनता संपूर्णपणे त्रस्त झालेली असून त्यांनी आपला रोष ग्रामपंचायत मध्ये झालेल्या निवडणुकीतून मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केलेला असून काँग्रेसला ग्रामीण भागातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदारांचे आभार मानण्यात येत आहे व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे. असे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड प्रफुलभाऊ मानकर यांनी कळविले आहे.