
प्रती (प्रवीण जोशी ढाणकी
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात आणि ढाणकी परिसरात सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे व ढगफूटी सारखा धो धो पाऊस जुलै, ऑगस्ट महिन्यात पडल्याने शेतशिवारातील पीक उध्वस्त झाले. अख्खे शेत शिवारात तलावसदृष्य परीस्थिती निर्माण होऊन संपूर्ण पीके पाण्याखाली राहील्याने सड मोठ्या प्रमाणावर होऊन, दुबार, तिबार पेरणी चा नाहक भुर्दड शेतकऱ्यांना बसला आहे. या शिवाय रस्ते उखडले, घरांची व जनावरांचे गोठ्यांची पडझड झाली आहे, याची नुकसान भरपाई देणार म्हणून शासन वारंवार सांगत आहे. मंत्री महोदय आणि विरोधी पक्ष नेते सह सर्व मंडळी नी नुकसान ग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला, आज दोन महिने झाले तरी सुध्दा नुकसान भरपाई मिळालीच नाही ही त्वरित द्यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्याकडून होत आहे.
