
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधत वाचनालयाच्या विकासाचा ध्यास अंगी बाळगणारे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर व कोषाध्यक्ष मा. अशोक चौधरी यांचे हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी लेखक, साहित्य, शाहिर, कथा,तथा कांदबरीकार म्हणून संपूर्ण जगात साहित्य रूपी क्रांती घडवुन अणणारे म्हणून जगात ओळखल्या जाणारे आणि साहित्य क्षेत्रात अप्रतिम व्यक्तिमत्व असलेल्या क्रांतिकारी परिवर्तनवादी लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा कार्याचा उजाळा दिला. यावेळी वाचनालयाचे सभासद नामदेवराव जेनेकर, प्रभाकरराव मोहितकर, ग्रंथपाल शुभम कडू आणि वाचनालयातील वाचक उपस्थित होते.
