छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेचे आयोजन


ढाणकी प्रतिनिधी:. प्रवीण जोशी

स्त्री शक्तीचा हातखंडा असलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये महिलांनी विशेष सहभाग घेऊन उत्कृष्ट स्थापत्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व इतर कला कौशल्य अशा विविध रांगोळीची आरास काढण्यात आली होती. त्यात प्रथम, द्वितीय ,तृतीय असे बक्षीस ठेवण्यात आले होते. रांगोळीचे परीक्षण आशाताई कलाने मॅडम व डॉक्टर प्रीती गंदेवार यांनी केले. सोनाली फुलबांधे हीस प्रथम पारितोषिक, श्रेया होडगीर द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक नीता कांबळे तर चतुर्थ पारितोषिक मनीषा गायकवाड हीस प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. डॉक्टर गंदेवार मॅडम व आशाताई कलाने मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते . रुग्णाला लागणारे रक्त खूप महत्त्वाचे असते. याला सर्व उपस्थित मान्यवर व रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी तब्बल ४० रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. ही रक्त पेडी गोळवलकर गुरुजी बंदा घाट रोड हनुमान पेठ (वजीराबाद) नांदेड येथे जाणार आहे. यावेळी राम महाजन जनसंपर्क अधिकारी, उदय राऊत तंत्रज्ञ, विठ्ठल हेडे जनसंपर्क , दमयंती बाच्छे तंत्रज्ञ व कांताबाई लुदुरवाड परिचारिका या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, आनंदराव चंद्रे, भाजपाचे अध्यक्ष रोहितजी वर्मा, महाराष्ट्र काँग्रेस समन्वयक अमोल तुपेकर, माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश गायकवाड, सुभाष कुचेरिया ,महेश पिंपरवार, नगरसेवक बाळाभाऊ योगेवार, संतोष पुरी हे उपस्थित होते. व तसेच सकाळी ९ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दुपारी दोन वा. नंतर पारंपरिक मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता होणार असून सर्व शिवप्रेमींनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांनी आव्हान केले आहे.