
लोकहित महाराष्ट्र उमरखेड,तालुका प्रतिनिधी:संदीप जाधव
नितीन भाऊ भुतडा जिल्हा अध्यक्ष भाजपा व आमदार.नामदेव ससाने उमरखेड व महागाव विधानसभा यांच्या वतीने हरदडा येथे आज सभा घेण्यात आली शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी लिमिटेड उमरखेड रजिस्टर नंबर 104 सत्यशोधक शेतकरी संघ पॅनल उभारण्यात आले. त्यामध्ये 16 उमेदवार उभे केले असून त्या सर्वांची निवड झाली पाहिजे. संचालक मंडळाची निवडणूक 2023 ते 2028 या कालावधीसाठी येत्या 18 जून 2023 रोजी होणार आहे. त्यामध्ये भाषण 16 उमेदवारांनी दिले व एकनाथ खडसे माजी आमदार श्री प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी तर दमदार भाषण केले, श्री नामदेव जी ससाने आमदार व नितीनजी भूतडा यांनी पण भाषण केले असता पक्षपात न करता एकत्र येऊन उमरखेड तालुक्याचे भूषण वाढवले यासाठी सर्व शेतकरी बांधव भाषण ऐकून दंग झाले. काही जणांनी आपल्या राजकारणामध्ये घडलेले प्रसंग मांडले वैयक्तिक ज्या घडामोडी आहेत त्या मांडल्या महत्त्वाचे म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग नात्याचा लाभांश प्रत्येक सभासदांना दरवर्षी देण्यात येते रेशीम उद्योग विभाग निर्माण करण्याचा संकल्प दुग्ध व्यवसाय व संस्थेचा आर्थिक विकास होण्यासाठी दृष्टीने शक्य असलेले शेतीमालावर उद्योग जसे सरकी पासून तेल व ढेप उत्पादन करून सभासदांना सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात येईल. महत्वाची नगर पिके हळद चना तूर ज्वारी मालावर प्रक्रिया करण्यासाठी व ब्रँडिंग करून शेतकऱ्यांना बाजारपेठेची सुविधा निर्माण करून देईल, संस्थेच्या विकास प्रक्रिया सभासद मालकीच्या जमिनीवर सभासद व आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी योग्य प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सर्वांनी भाषणामार्फत दिली.
