
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे विशेष महत्त्व असून पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनचे कार्य तत्पर कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले व त्यांचे सहकारी पोलीस यांनी पोलीस स्टेशनच्या पटांगणात विविध वृक्षांची लागवड केली.
आज जिकडे तिकडे झाडांची कटाई सुरू असून नवीन झाडे लावण्याकडे कल कमी दिसतो मात्र याला अपवाद वडकी पोलीस स्टेशन ठरत असून या वडकी स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांनी आपल्या पोलिस सहकाऱ्यासह पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून सर्वात जास्त ऑक्सिजन उत्सर्जन करणारा वृक्ष वड, निंब या वृक्षाबरोबरच पिंपळ, नारळ, जांभूळ, आंबा तसेच बांबू व अशोका या झाडांची पोलीस स्टेशन परिसरात लागवड केली. तसेच ह्या झाडांचे व्यवस्थित संगोपन करून मोठी करण्याची जबाबदारी वडकी पोलीस स्टेशन ठाणेदार व सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली.
