राळेगाव येथे जुनी पेन्शन आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कर्मचाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसाद [ वर्ग 10 व 12 च्या बोर्ड परीक्षेत कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन काळ्या फिती लावून केले कामकाज ]

सहसंपादक: रामभाऊ भोयर

जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य मागणी व अन्य मागण्यासाठी दिनांक 14 मार्च पासून राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. असून राळेगाव तालुक्यात याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. असून आज बेमुदत संप आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा राळेगाव तालुक्यातील शेकडो कर्मचारी वृंद यात सहभागी झाले असले तरी
दुसरीकडे अनेक शिक्षक संघटनाच्या वतीने घेतलेल्या निर्णया नुसार वर्ग 10 व 12 च्या बोर्ड परीक्षेत कर्मचाऱ्यांनी विद्यार्थीचे हित लक्षात घेऊन बोर्ड परीक्षा काळात काळ्या फिती लावून केले कामकाज केल्या मुळे विद्यार्थीची बोर्ड परीक्षा काळात पेपर ची होणारी गैरसोय दूर केल्यामुळे विध्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त करून अप्रत्यक्षरित्या शिक्षकांच्या बेमुदत संपास पाठिंबाच दिला असून राळेगाव तालुक्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या हाकेला प्रतिसाद देत महसूल, शिक्षण, आरोग्य, पंचायत, भूमी अभिलेख या सह इतरही सर्व संघटना एकत्र आल्या.असून NPS रद्द करा जुनी पेन्शन लागू करा ही संघटनाची मुख्य मागणी आहे. विशेष म्हणजे स्त्री कर्मचारी यांनी आज देखील संपाच्या दुसऱ्या दिवशी देखील या संपात हिरीरीने भाग घेतला. हा संप बेमुदत असल्याने राळेगाव तालुक्यातील आज सुद्धा अनेक शाळा बंद झाल्या. सर्व विभागातील कर्मचारी सहभागी असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावीत झाले आहे.
परंतु आज बेमुदत संप आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा राळेगाव तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधीनी तहसील कार्यालय परिसरात उपस्थित राहून अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करून शासनाने राज्य दिवाळखोरीत जाण्याची चुकीची आकडेवारी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची बाब अनेकांनी माडली. जो पर्यंत जुनी पेन्शन लागू केल्याची घोषणा करण्यात येत नाही तो पर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला.
या संपा ने तालुक्यातील कामकाज प्रभावीत झाले असून . जुन्या पेन्शन च्या या आंदोलनाने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली असली तरी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहे.तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राळेगाव तालुक्यातील जनतेची गैरसोय होत असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप कधी समाप्त होतो याकडे राळेगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे…