सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील मेंगापूर रोडवरील तीन ते चार शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस चोरीला गेला आहे त्यामुळे शेतातील कापूस चोरांना आवरा हो असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. सद्यस्थितीत बहुतांश शेतातील कापूस हा फुटून आहेत मजुर मिळत नसल्याने शेतातील कापूस हा तसाच आहेत याच गोष्टीचा फायदा नेमके चोरटे घेत आहेत मेंगापूर रोडवरील कवडू उरकुडे मनोज बोरेकार सुनील अवतारे ज्ञानेश्वर उपाते या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसावरती चोरट्यांनी डल्ला मारला आहे .अनेक दिवस शेतातील कापूस तसाच फुठून असल्याने चोरट्यांची नजर कापसावरती गेली शिवाय कापूस हा अंधारामध्ये सुद्धा दिसून पडतो याचा सुद्धा फायदा चोरटे घेत आहेत रस्त्याला लागून असलेल्या किंवा आत मधल्या शेतातील कापूस चोरटे चोरत आहेत. रस्त्याला लागून असलेल्या शेतातील कापूस चोरटे मागून वेचत आणतात चोरांची संख्याही अधिक आहेत तसेच ते गाडी वगैरे घेऊन येतात त्यामुळे कापूस चोरणे त्यांना सोपे जात आहेत ज्या दिवशी पासून कापूस चोरीला गेला त्या दिवशीपासून काही शेतकरी हे शेतात जागली जात आहेत तर काही शेतकरी हे रात्री बेरात्री रस्त्याने तसेच शेतात चकरा मारतात जेणेकरून कापूस चोरीला जाणार नाही .कष्टाने पिकवलेला कापूस चोरी जाताना पाहताना निश्चितच शेतकऱ्याला कष्ट होत आहेत कापसाला पाहिजे तसा भाव नाही शिवाय कापूस वेचायला मजुर मिळत नाही .आणि भरीसभर कापूस चोरीला जात आहे .या गोष्टीमुळे निश्चितच शेतकऱ्याला वेदना होत आहे कापसाला भाव जरी नसला तरी चोरटे मात्र तो कापूस विकून मजा करत आहेत यामुळे कापूस चोरट्यांना आवरा हो असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे अशा चोरत्यांनां पकडून शेतकऱ्यांचा कापूस वाचवावा अशी माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.
प्रतिक्रिया
आमची रात्रीची गस्त ही सुरूच आहे नुकतेच आम्ही शेतातील मोटरपंप चोरणारे चोरटे पकडले कापूस चोरणार्या चोरट्यानाहीं निश्चित पकडणार सोडणार नाही कापूस चोरीला गेल्यास शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात कळवावे.
रामकृष्ण जाधव पोलीस निरीक्षक राळेगाव
