अवैध रेती चे दोन ट्रॅक्टर भल्या पहाटे पकडले


राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


रामतिर्थ शिवारात रामगंगा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करुन रेती तस्करी करताना दोन ट्रॅक्टर भल्या पहाटे महसूल प्रशासनाने पकडले आहे.
वाहन चालकाने दिलेल्या जबानी वरुन हे दोन्ही ट्रॅक्टर नितिन उर्फ रिंकू मदन हिकरे रा.राळेगांव चे असून,तहसीलदार डाँक्टर रविंद्र कानडजे यांचे मार्गदर्शना खाली मंडळ अधिकारी विश्वास वाघ,तलाठी बंडू तीरणकर,वाहन चालक विजय सुर्यवंशी यांनी हे दोन्ही ट्रॅक्टर पळून जात असताना शिताफीने पकडून तहसील कार्यालय राळेगांव च्या आवारात जप्त करण्यात आले आहे.
महसूल प्रशासनाचे धाड सत्रामुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे हे विशेष..