
शाळेतील वर्ग 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कॉपी मुक्त अभियाना बाबतीची शपथ
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये दिनांक 23 जानेवारी ला सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त तसेच राष्ट्रीय छात्रसेना यांच्या ध्वजाचे ध्वजारोहण सुद्धा करण्यात आले. तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती बद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनी कु वैष्णवी सोनटक्के, कु अनुष्का देठे, कु सृष्टी धोटे,कु श्रेया झाडें,कु निकिता पंधरे, कु हिमानी बोरपे यांनी माहिती दिली तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल शाळेतील शिक्षक विनोद चिरडे यांनी सविस्तर माहिती दिली.. याच जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील वर्ग 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कॉपी मुक्त अभियाना बाबतीची शपथ सुद्धा देण्यात आली. तसेच येणाऱ्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात 10 व 12 वी च्या विदयार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या कॉपी मुक्त अभियानाची संपूर्ण माहिती देण्यात सुद्धा देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु स्नेहल शेंडे हिने केले तर आभार प्रदर्शन सूचित बेहरे यांनी केले. कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थ्यां मध्ये मोठा उत्साह दिसून आला तर या कार्यक्रमा करीता शाळेतील उपस्थितीत सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले….