
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव: मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू आहे.रमजान रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा उपवास ठेवतात मन व शरीर शुद्ध करण्याचा एक मार्ग असल्यामुळे मुस्लिम धर्म रोजा ला विशेष महत्व आहे.
सध्या मार्च महिना सुरू असल्या मुळे कडक उन्हात राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेख अयान शेख शब्बीर वय १० वर्षे, यांने आपल्या आयुष्यातील रमजानचा पहिला उपवास ठेवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शेख अयान शेख शब्बीर त्यांने सकाळी पहाटे ५ वाजे पासून ते सायंकाळी सहा वाजून 25 मिनिट वाजेपर्यंत अन्नाचा एक कण व पाण्याचा एक थेंबही न पिता दिवसभर रोजा (उपवास) धरून ईश्वरा ( अल्लाह) चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली , तर प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगावचे वाहन चालक शेख शब्बीर शेख रहीम
यांचा मुलगा आहे.
