
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी दि. २५ जुलै २०२५ रोजी आमदार शरद सोनवणे याच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते याची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत आमदार शरद सोनवणे आढावा घेत असता कोणतेही कारण नसतांना त्यांनी आदिवासी विकास मंत्री मा.प्रा.डॉ. अशोकराव उईके यांना मूर्ख मंत्री, चोर, साला असे अश्लील शब्द वापरून जाहीर रित्या अपमानित केले असून हा आदिवासी मंत्र्यांचा अपमान नसून सर्व आदिवासी समाजाचा अपमान आहे. तेव्हा जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राळेगाव तालुक्यातील आदिवासी समाज संघटनेच्या वतीने दिं.२९ जुलै २०२५ रोज मंगळवारला उपविभागीय अधिकारी तथा पोलीस निरीक्षक राळेगाव यांना देण्यात आले आहे.
खरे तर आदिवासी विकास मंत्री हे संविधानिक पदावर कार्यरत आहे व त्यांच्याबाबतीत समाजाला उद्देशून तिरस्कार केला आहे करीता कार्यवाही होणे गरजेचे आहे.तेव्हा सोनवणे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अन्यथा आदिवासी समाज संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे .जर अप्रिय घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील तेव्हा आमदार शरद सोनवणे यांच्यावर ताबडतोब ॲट्रॉसिटी एक गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन राळेगाव तालुक्यातील आदिवासी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले असून निवेदन देतेवेळी अभिजीत कदम ,संदीप पेंदोर, सुधारक गेडाम,अनिल राजूरकर, गणेश देशमुख,बबन भोंगारे ,दिलीप कन्नाके, अरुण देहारे, संदीप तेलंगे,रुपेश बोरकुटे,निलेश घिनमिने,आशिष इंगोले छायाताई पिंपरे, सीमा एडसकर, विद्या मेश्राम, कविता गेडाम, शीला सलाम, चंद्रकांत मशरू, किशोर जुनूनकर ,राजू परचाके, अंकुश ठाकरे ,मधुकर गेडाम, वाल्मीक मेश्राम, रामदास कुळसंगे, दिनेश करपते, गजानन आडे, प्रमोद पेंदोर,अशोक वर्मा, रामा डोंगरे, बादशहा भाई काझी,नसीम भाई, बाळकृष्ण सलाम, शंकर तोडासे, बंडू कींनाके, ज्ञानेश्वर आत्राम, भारत तोडासे, किरण आडे, धनराज आडे ,विशाल आत्राम ,दादाराव नैताम आदी आदिवासी समाज बांधव.तथा सर्व आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
