
दिनांक ३०/७/२०२३ रोजी गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून प्रवीण सीताराम घोडगे वय ३५ वर्ष, रा. चातारी हा अवैध्यरित्या त्याचे ताब्यातील दुचाकीच्या दोन्ही बाजुला दोन पोत्यात देशी दारू घेऊन जाताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील ४ पेट्या दारू ज्यात १९२ देशी दारूच्या बॉटला ज्याची एकूण किंमत १३४४० /- रु व एक स्प्लेंडर मोटार सायकल कि ७५०००/-रु. असा एकूण ८८४४०/-रु चा मुद्देमाल मिळून आल्याने पो.स्टे. बिटरगाव(बू)येथे गुन्हा दाखल करुन तपास हाती घेतला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक- पवन बन्सोड सा, मा.अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी- प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली स.पो .नी सुजाता बन्सोड, पो उ.नी शिवाजी टिपूर्णे, पो.ना. मोहन चाटे, पो.ना. देविदास हाके .पो.शी. निलेश भालेराव पो. स्टे बिटरगाव यांनी सदरची कार्यवाही केली.
