
लोकसभा निवडणुकी बाबत करण्यात आली चर्चा
हिंगणघाट:- १३ मार्च २०२४
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे जनसंवाद मेळाव्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी भेट घेऊन स्वागत केले व आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चेदरम्यान वर्धा लोकसभेचा उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा स्वतःहून आढावा घेतला अस्ता संपूर्ण समीकरणाचा आढावा दिला त्यावेळी माजी आमदार वसंतराव पुरके,राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर,मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख तसेच माजी राज्यमंत्री संजय देशमुख सोबत असताना यवतमाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारी बाबत चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याना सांगितले की इंडिया अलायन्स महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना उभाठा,काँग्रेस तसेच मित्र पक्ष संघटना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या साथीने एक जोमाने काम करुन जास्तीत जास्ती खासदार इंडिया अलायन्सचे निवडूण आणायचे आहे त्यासाठी सर्व एकत्र येऊन सत्ता काबीज करायची आहे आणि वर्धा जिल्ह्यातील खासदार हा महाविकास आघाडीचा असेल असा विश्वास व्यक्त करत या सरकारला धडा शिकवायचा आहे असे मत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
