राळेगाव तालुक्यातील जनतेने अनुभवला पटाचा थरार, प्रशांत तायडे मित्रपरिवारां तर्फे आयोजन

सहसंपादक -रामभाऊ भोयर

भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने राळेगाव येथे दि. 24,25 व 26 मार्च रोजी माजी सभापती पंचायत समिती राळेगाव प्रशांत तायडे व मित्रपरिवार यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.यात जनरल गट व क गट असे गट ठेवण्यात आले, यात तीन लाख अकरा हजाराचे जंगी बक्षीस हे ठेवण्यात आले होते,विशेष आकर्षण बैला सोबत घोडा धावणे हे नैत्र दीपक सुखाचा आनंद राळेगाव जनतेला पाहण्यास मिळाला असून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय हजर होता, जनरल गटात यात आतिश वर्मा वाशिम 6.15 अंतर पार करत अवल्ल येऊन प्रथम क्रमांकाचे  51 हजार रुपये पारितोषिक पटकविले, रामप्रसाद राठोड बैतूल यांच्या जोडीने 6.17 सेकंदात बाजी मारून दृतीय  41 हजार रुपयाचे  पारितोषिक पटकाविले,आरिफ खान जुम्मा तला फुळसवांगी 6.17 सेकंदात धाव पूर्ण तृतीय क्रमांकाचे 31हजाराचे बक्षीस  पटकावले,गजानन झोटिग उपसरपंच रावेरी 6.18 सेकंदात धाव पूर्ण करून चतुर्थ बक्षीस रु.21 हजाराचे पटकाविले, तर क गटातील शर्यतीत साहेबराव पाटील हिवरा संगम 6.5 सेकंदात धाव पूर्ण करून प्रथम क्रमांक रुपये 21 हजार पटकाविला,रामप्रसाद राठोड बैतूल 6.15 सेकंदात धाव पूर्ण करून द्वितीय क्रमांक रुपये 11 हजार पटकाविला,समीर पाटील घारफळ 6.24 सेकंदात धाव पूर्ण करून तृतीय क्रमांक रुपये 9 हजार पटकाविला,अश्या स्वरूपात दोन्ही गटात 13/13 असे बक्षिसाच्या वर्षाव करण्यात आला,या पटात मध्यप्रदेश, जळगाव ,वाशिम,वर्धा,यवतमाळ जिल्ह्यातील  86 अशा विक्रमी बैल जोड्यानी भाग घेतला होता, कार्यक्रमाची सांगता आज वी. आमदार अशोकजी उईके यांच्या उपस्थितीत सर्व विजेता मालकांना बक्षीस व ट्रॉफी देवून करण्यात आले.