
सहसंपादक : रामभाऊ भोयर
**
सामान्य समाजातील व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तसेच समाजात मानवतावाद कसा निर्माण होईल यासाठी समाजातील काही संघर्षात जिवन जगुन आपली प्रतिमा उभी अशा महान व्यक्ती च्या जयंतीच्या कार्यक्रम आपण समाज प्रबोधन म्हणून घेत असतो आणि आपण घेतला पाहिजे हे आपलं सामाजिक दायित्व आहे असे स्पष्ट मत मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी व्यक्त केले* मजरा येथे शामा दादा कोलाम यांच्या फलकाचे अनावर करुन सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सहभागी अध्यक्ष मा विश्वास कुभेकर, कोलाम समाज विचार मंच उपस्थित होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच होते *राबिनहुड शामा दादा कोलाम यांच्या संघर्षाची ज्योत प्रत्येक पोडावर पेटवली पाहिजे आणि समाजातील अज्ञानाचा अंधार दुर करण्यासाठी आम्ही जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार अशी भूमिका मधुसूदन कोवे गुरुजी यांनी प्रत्यक्ष मजरा येथे मांडली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव आत्राम यांनी केले तर प्रास्ताविक मांडणी वर्षा लोणारे यांनी केली या कार्यक्रमात सहभागी मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ हुशेण खोरद, सखी मा अरुण कोवे माजी सरपंच सखी प्रल्हाद काळे लक्ष्मण किनेकर खटेश्वर प्रेमा पत्रिवार पत्रकार, सोनाली मरगडे या कार्यक्रमाचे आयोजन भारत देवतळे, अनिल जुनगरे दिलिप आंजिकर शंकर जुनगरे संदिप आंजिकर विजय वैद्य राजु देवतळे विनोद बोडे सुरज बोडे कवडु शिले आणि समस्त मजरा गावातील महिला पुरुष सहभागी झाले होते सर्वांनी चहा पाणी घेऊन मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी आभार मानले
