ढगाळ वातावरणाचा तूर पिकला फटका निसर्गचक्राच्या फेऱ्यात शेतकरी पुन्हा धास्तावला


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


तालुक्यात जुलै ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले त्यातूनही सावरत पावसाच्या तडाख्यातून वाचलेली तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यात आले आहे. पिवळ्याधमक फुलांनी शेतशिवारे फुलले असतांना आलेल्या ढगाळ वातावरनाने पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढून फुलोरा गळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील शेतकरी तूर सोयाबीन, तसेच कापूस पिकामध्ये तुरीचे आंतरपीक मोठ्या प्रमाणात
घेतात. काही शेतकरी आधुनिक पद्धतीने निखुळ्या तुरीचीदेखील लागवड करतात, यावर्षीच्या खरीप हंगामात अति पावसामुळे तुरीचे पीक जळून गेले आहे मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसेबसे वाचलेले तुरीचे पीक सध्या जोमात असल्याचे दिसून येत आहे. सध्या तुरीला मोठ्या प्रमाणात फुले लागली असून, तुरीला लागलेली ही पिवळीधमक फुले लक्ष वेधून घेत आहेत, तर अनेक ठिकाणी कोवळ्या शेंगादेखील लागल्याचे दिसून येते आहे यातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा निर्माण झाली असतांना मात्र, ढगाळ वातावरण आले असल्यामुळे आलेल्या शेतकरी निसर्ग चक्राच्या फेऱ्यात पुन्हा धास्तावल्याचे दिसून येत आहे . सध्या तूर पीक जोमात असतांना दोन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर पिकावर अनेक ठिकाण‍ अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे त्यामुळे लागलेल्या कोवळ्या शेंगा अळ्या पोखरत असून, ढगाळ वातावरणामुळे फुलोरा गळण्याचे प्रमाणदेखील दिसू येत आहे.तसेच अळीचा प्रादुर्भाव वाढला असून तुरीची प्रत खराब होण्याची भीत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.