
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 4 मार्च 2025 ला प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पंचायत समिती राळेगाव यांनी संत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा, राळेगाव येथे तालुका स्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय भारती ईसाळ म्याडम, उदघाटक म्हणुन मा. गटशिक्षणाधिकारी श्री. काकडे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणुन शालेय पोषण आहार अधिक्षक मा. दाभाडे साहेब, आणि स्पर्धेच्या परीक्षिका म्हणुन माननीय कृषी अधिकारी पाटील म्याडम व कृषी विस्तार अधिकारी माननिय बनकर म्याडम यांची निवड करण्यात आली होती. या प्रसंगी मातोश्री मंजुळा माता ग्राम निर्माण शिक्षण संस्था, राळेगाव चे सचिव माननीय येनोरकर सर, शालेय पोषण आहार ऑपरेटर पिसाळकर म्याडम तसेच राळेगाव पंचायत समिती तिल केंद्रप्रमुख माननीय प्रताप ओंकार सर, जगदीश ठाकरे सर, सुभाष पारधी सर, लक्ष्मण ठाकरे सर, सुरेश कुंभलकर सर, सतीश आत्राम सर, अनिल वरूडकर सर, हरिदास वैरागडे सर आणि सागर धनालकोटवार सर इत्यादींची उपस्थिती होती. स्पर्धेच्या उदघाटन समारंभा दरम्यान उपस्थित मान्यवरांनी दैनंदिन आहारातील कडधान्य आणि तृणधाण्याचे महत्व पटवून दिले तर परीक्षकांनी स्पर्धेचे स्वरूप व नियम समजावून सांगितले. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण 20 जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी संस्थेच्या शाळांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांकाचे रोख 5 हजार रुपयांचे पारितोषिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सराटी द्वितीय क्रमांकाचे रोख 3 हजार 500 रुपयांचे पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकी सुकळी तर तृतीय क्रमांकाचे रोख 2 हजार 500 रुपयांचे पारितोषिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोणी यांनी पटकावले.
सदर स्पर्धेच्या उदघाटन व समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक गणेश वरूडकर यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक आनंद रामटेके यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा राळेगाव येथील मुख्याध्यापक उमेश बुरले, सहाय्यक शिक्षक राहुल सोयाम, पवन गलाट, अमोल पाहुणे आणि शाळेतील संपूर्ण शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
