मुसळधार पावसामुळे वडकी येथील राळेगाव चौफुलीला आले नाल्याचे स्वरूप

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दि 10 सप्टेंबर रोजी राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दुपारपासून पावसाने चांगलेच थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे वडकी येथील राळेगाव चौफुलीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले,चौफुलीवर रोडच्या दोन्ही भागात पावसाचे पाणी चांगलेच साचल्यामुळे वाहनचालकांची या पाण्याने चांगलीच दमछाक झाली,राळेगाव चौफुलीला लागून असलेल्या अनेक छोट्यामोठ्या दुकानदारांना या साचलेल्या पाण्याचा सामना करावा कागला,काही वाहनचालकांची तर या साचलेल्या पाण्यात मोटरसायकल बंद पडली तर काही वयोवृद्ध नागरिकांना येजा करतांना याच पाण्यातून आपली वाट काढावी लागल्याचे दिसून आले,स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडकी येथील अनेक वाहनचालकानी केली आहे,