खरेदी विक्री संघाच्या बॅंक (संचालक) प्रतिनिधीपदी जितेंद्र गोपालबापू कहूरके


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात चांगल्याप्रकारे काॅंग्रेस पक्षाची पकड असून नुकतेच खरेदी विक्री संघावर बॅंक प्रतिनिधी निवडून पाठवायचे असून त्या पदावर धानोरा विभागातील तरूण कांग्रेस कार्यकर्ते जितेंद्र गोपाल बापू कहूरके यांची निवड करण्यात आली असून यांची निवड काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा राळेगाव तालुका सहकार क्षेत्राचे नेते अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांनी केली असून ते यापुढे संचालक म्हणून कार्य करणार असून त्यांच्या निवडीच्या वेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर,काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महाजन, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, माजी प. स शामभाऊ येणोरकर, केशवराव पडोळे, रामभाऊ भोयर, प्रकाश मेहता, सुरेश पेंद्राम , बाळकृष्ण घिनमिने सुभाष खेडेकर,मोहन नरडवार ( सरपच) हनुमान डाखोरे यांचेसह अनेक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.अशाप्रकारे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने धानोरा विभागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.